बारामती तालुक्यातील माळेगाव येथे धक्कादायक ; सुनेवर चुलत सासऱ्याचा कोयत्याने हल्ला
सासरे पैसे मागायला गेल्यावर त्यांना शिवीगाळ

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे धक्कादायक ; सुनेवर चुलत सासऱ्याचा कोयत्याने हल्ला
सासरे पैसे मागायला गेल्यावर त्यांना शिवीगाळ
बारामती वार्तापत्र (प्रतिनिधी – संदिप आढाव)
जागेच्या वादातून चुलत सासरा व इतर चार जणांनी महिलेला शिविगाळ करुन बेदम मारहाणीची घटना मुंढे वस्ती माळेगांव येथे घडली आहे.सदर घटनेत जखमी सुनेचे दीड लाखांचे सोन्याचे गंठण देखील तोडण्यात आहे.
ताजुद्दीन इसाक मुंढे,शहारुख ताजुद्दीन मुंढे,सलिम रज्जाक मुंढे, अल्ताफ रज्जाक मुंढे, मुमताज रज्जाक मुंढे (सर्व जण रा.मुंढेवस्ती माळेगाव बु ता.बारामती) या पाच आरोपींवर समिना अन्वर मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ही आपल्या कुटुंबासह मुंढे वस्ती माळेगांव येथे पती,सासु सासरे यांच्या सोबत रहात आहे.फिर्यादीच्या सासऱ्यांना तीन भाऊ असुन एक मयत आहे तर इतर वेगवेगळे राहतात.
फिर्यादी रहात असलेल्या घरात व समोरील जागेवरून चुलत सासरे ताजुद्दीन मुंढे, रज्जाक मुंढे यांच्यात जागेच्या मालकी वरुन वाद आहे.
फिर्यादी व आरोपी यांचे एकत्रित कुटुंब असताना सुपे ता.बारामती येथे एक प्लाट घेण्यासाठी फिर्यादीच्या सासऱ्याने पैसे दिले होते.मात्र हा प्लाट परस्पर विकला गेला.फिर्यादीचे सासरे पैसे मागायला गेल्यावर त्यांना शिवीगाळ केली गेली.
सदर आरोपी फिर्यादीला शिविगाळ करत असताना मला शिवीगाळ का करताय असे म्हटल्यावर ताजुद्दीन मुंढे यांनी कोयत्याने डाव्या हातावर वार केला.तर इतरांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
तसेच फिर्यादीचे दीड लाखांचा सोन्याचा गंठण शाहरुख मुंढे यांनी खिशात टाकला.फिर्यादीवर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.सदर घटनेचा तपास हवालदार अमर थोरात करीत आहेत.