स्थानिक

बारामती नगर परिषदेच्या “कोरोना योद्धा” कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला.

सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

बारामती नगर परिषदेच्या “कोरोना योद्धा” कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला.

सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

बारामती वार्तापत्र

बारामती (ता. १८ ऑक्टोबर) – येथील पर्यावरण या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने काम करणाऱ्या, आदर्श गाव काटेवाडीच्या शिल्पकार, बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू वृद्धांना दृष्टिदानाचे काम करणाऱ्या एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा मा. सौ. सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांनी सामाजिक संदेश देत साजरा केला.

यामध्ये गेली आठ महिने कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असणाऱ्या बारामती नगर परिषदेच्या “कोरोना योद्धा” कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोना संसर्गाशी दोन हात करणाऱ्या योध्यांना आवश्यक असणाऱ्या १०० पी पी ई किटचे वाटप करण्यात आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, यातील ज्या रुग्णांची प्रकृती खूप खालावते, ज्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, अशावेळी त्या अत्यवस्थ रुग्णाला आवश्यक असणाऱ्या “रेमडीसीविर” या १५७ इंजेक्शनचे वाटप शासकीय रुग्णालयांना भेट देण्यात आली.


कार्यक्रमास बारामती नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बीडीओ राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सदानंद काळे, रुई रुग्णालयाचे डॉ. दराडे व अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याच बरोबर मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना व्हर्च्युअल वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरात एक स्वदेशी झाड लावून त्याचा फोटो फोरमच्या लिंक वर पाठवायचा आहे, याचे एक प्रमाणपत्र ऑनलाईन त्या व्यक्तीला पाठविले जाणार आहे, अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मा. सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram