बारामती पाठोपाठ सोलापूर करांसाठी शरद पवारांनी देऊ केले रेडमिसिवर इंजेक्शन.
सोलापूर दौऱ्यावर असता केली मदत.

बारामती पाठोपाठ सोलापूर करांसाठी शरद पवारांनी देऊ केले रेडमिसिवर इंजेक्शन.
सोलापूर दौऱ्यावर असता केली मदत
सोलापूर:-प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर दौर्यावर आले असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे आज ८० रेडमिसिवर इंजेक्शन सुपूर्द करण्यात आले. यावेळी सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर तसेच उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर मोहोळ चे आमदार यशवंत माने हे यावेळी उपस्थित होते.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर आज सोलापूरचे पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्या कडून सर्व परिस्थितीचा तसेच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर होते.






