इंदापूर

देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी

देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी

इंदापूर : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त येथील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सर्व जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देत देशाची राज्यघटना, भारतीय रिझर्व बँकेची स्थापना, तसेच सर्व क्षेत्रातील डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे असून देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक त्रिशरण, पंचशील यावेळी घेण्यात आले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारे देशाच्या रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. १९९० मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय लोकशाहीत त्यांचे मोठे योगदान असून त्यांचे विचार आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button