स्थानिक

बारामती बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतरण….

लवकरच नवे बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत...

बारामती बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतरण….

लवकरच नवे बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत…

बारामती वार्तापत्र

बारामती बस स्थानकाचे नवीन सुसज्ज, अत्याधुनिक अशी ईमारतीचे काम बारामतीत लवकर सुरु होत आहे. त्यामुळे सदरील कामामुळे बारामती बस स्थानक हे तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आगारात १३ जून पासून स्थलांतरित करण्यात आली असल्याची माहिती बारामती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून लवकरच बारामतीत सुसज्ज असे बारामती बस स्थानक उभारण्यात येणार आहे.
सदरील तात्पुरत्या स्थानकात प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, कंट्रोल रुम, ध्वनीक्षेपन यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा, टॉयलेट बाथरूम ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पूर्वीप्रमाणे सर्व बसेस तात्पुरत्या आगारातून सुटणार आहेत. त्यासाठी १३ जून पासून तात्पुरते बस स्थानक सुरू करण्यात आलेले आहे. तरी राज्य परिवहनच्या सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रमाकांतजी गायकवाड, व बारामती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button