बारामती मुस्लिम समाजाची भूमिका; गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी
कठोर कारवाई करण्याची मागणी

बारामती मुस्लिम समाजाची भूमिका; गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी
कठोर कारवाई करण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने आज प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती शहर पोलीस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध व गोसंरक्षण संदर्भातील कायद्यांना बारामतीतील मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आमच्या हिंदू समाज बांधवांच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय असलेल्या गोमातेला “राष्ट्रीय पशू” घोषित करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी लक्षात घेऊन निरुपयोगी व पालन अशक्य झालेल्या गायींसाठी आर्थिक मोबदला देणे, गोपालनासाठी प्रतिदिन अनुदान सुरू करणे, गोशाळांची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारणे, तसेच गोसंरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या व मॉब लिंचिंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
गोवंश संरक्षणासोबतच कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्ये जपली जावीत, अशी भूमिका यावेळी बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने मांडण्यात आली.
सदर निवेदनावर उपस्थित या लोकांनी सह्या केल्या –
मुनीर दादाभाई तांबोळी, अजिज जाफर सय्यद, पीर मोहम्मद फतेह मोहम्मद शेख, कासम हरून कुरेशी, एजाज बशीर शेख ,सलमान मन्सूर शेख, रियाज सुलतान सय्यद, लतीफ छबूलाल शेख , मोइन युनुस बागवान, फैयाज इलाही शेख , मन्सूर कमाल शेख, आक्रम अजिज बागवान, इब्राहिम आजिज बागवान, आरिफ दिलावर मुजावर, अर्सलान जाकिर बागवान, आसिफ चांद भाई शेख, दस्तगीर रहमान शेख , अजहर युनुस शेख , तालीब कुरेशी, खाजा कुरेशी, ए ,के, कुरेशी, रियाज शौकत शेख,वसीम नजीर कुरेशी ,कलीम कुरेशी बसपा पार्टीचे जेष्ठ नेते काळुरामजी चौधरी विजय जगताप बीएसपी जिल्हा उपाध्यक्ष, संजय सदाशिव वाघमारे आरपीआय तालुकाध्यक्ष बारामती. सामाजिक कार्यकर्ते चिऊशेठ जंजिरे अफरोज बाबुलाल मुजावर, तोसीफ मजीद बागवान, चिऊ – शेठ जंजिरे , जैद मुजफ्फर बागवान ,मुन्नाभाई (फुल अँड फायनल) बागवान, आय्याज शेख पत्रकार तैनुर शफीक शेख, मन्सूर शेख, मोईन बागवान, मोहसीन शेख व तसेच इतर मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.
योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.






