अंकिता पाटील-ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
ट्विट करत दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
अंकिता पाटील-ठाकरे यांनी म्हंटले आहे की, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेणार असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी.