बारामती येथे ‘संविधान जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न
संविधान जनजागृतीबाबत चित्रफीत दाखविण्यात आली

बारामती येथे ‘संविधान जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न
संविधान जनजागृतीबाबत चित्रफीत दाखविण्यात आली
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती आणि विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळा’ विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य अनिकेत मोहिते, ॲड. अमोल सोनवणे, गटविकास अधिकारी किशोर माने, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, नीलिमा मेमाणे, विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य भरत शिंदे आदी उपस्थित होते.
ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंगाची माहिती दिली. याद्वारे भारतीय संविधानाचे महत्त्व समजkवून सांगितले. भारताचे संविधानाचे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान आहे, असेही ॲड. लोखंडे म्हणाले.
श्री. शिंदे यांनी संविधानाबाबत आपले विचार व्यक्त केले. श्री. मोहिते, आणि ॲड.सोनवणे यांनी तसेच संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्वाबाबत विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यशाळेत संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. तसेच संविधान जनजागृतीबाबत चित्रफीत दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले. तर श्री. गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.