स्थानिक

वाढदिवस टायसन नावाच्या ‘बोकडाचा’

परिसरात कुतूहलाचा विषय

वाढदिवस टायसन नावाच्या ‘बोकडाचा’

परिसरात कुतूहलाचा विषय

बारामती वार्तापत्र
हो,हो हा वाढदिवस आहे एका टायसन नावाच्या ‘बोकडाचा’ आश्चर्य वाटले ना पण या बोअर जातीच्या बोकडाचा वाढदिवस बारामती तालुक्यात धुमधडाक्यात साजरा झाला आहे.

हौसेला मोल नसते आणि प्रेमाला अंत नसतो या ऊक्तीप्रमाणे आपल्या शेळीपालनाच्या गोठ्यात टायसन नावाच्या बोकडाचा पहिला वाढदिवस अगदी धूमधडाक्यात आणि प्रेम पूर्ण सोहळ्याचे आयोजन करून करण्यात आला.

बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे खुर्द येथील खोमणे यांच्या गोठ्यावर टायसन नावाच्या बोकडाचा वाढदिवस साजरा झाला आहे.
तुकाराम खोमणे व पंकू ताई खोमणे या ज्येष्ठ दांपत्याने हा वाढदिवस साजरा केला आहे.
या वाढदिवसासाठी शेळीपालन व्यवसायातील अनेक नामवंत उपस्थित होते.त्यामुळे या बोकडा विषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

Back to top button