बारामती व्यापारी महासंघातर्फे 100 पीपीई किट नगरपालिकेला सुपूर्त
प्रशासन यांच्याबरोबर सामाजिक संस्थेने सुद्धा पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे

बारामती व्यापारी महासंघातर्फे 100 पीपीई किट नगरपालिकेला सुपूर्त
प्रशासन यांच्याबरोबर सामाजिक संस्थेने सुद्धा पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे
बारामती वार्तापत्र
बारामती व्यापारी महासंगातर्फे बारामतीतील अंत्यविधी चे काम करणारे योध्दा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी 100 पी.पी.ई किटचे वाटप श्री.किरणराज यादव,मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
बारामतीतील सध्याच्या करोना परिस्तिथीत शासन, प्रशासन यांच्याबरोबर सामाजिक संस्थेने सुद्धा पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे असे आवाहन नागरपालिके तर्फे करण्यात आले होते. त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने पीपीई किटचे वाटप केले.
यावेळी बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती, उपाध्यक्ष सुरेंद्र मुथा , सचिव जगदीश पंजाबी, फक्रुसेठ भोरी, स्वप्निल मुथा, आदेश वडुजकर, शाम तिवाटने, मनोज मुथा, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर,संजय सोमाणी, नरेंद्र मोता, रमेश पंजाबी व इतर उपस्थित होते.