इंदापूर

लाखेवाडी -खारा ओढा रस्त्याचे भूमिपूजन अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 25 लक्ष रुपये निधी मंजूर

लाखेवाडी -खारा ओढा रस्त्याचे भूमिपूजन अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 25 लक्ष रुपये निधी मंजूर

निलेश भोंग प्रतिनिधी

अल्पावधीतच तालुक्यातील युवकांच्या मनावर छाप पाडणार्‍या व इंदापूर तालुक्यात “युवारत्न” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील या ज्या ज्या वेळी तालुक्यात वेगवेगळ्या कामासाठी फिरत असतात त्या त्या वेळी युवकांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेला दिसतो, आजही या कार्यक्रमानंतर त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या युवकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले असल्याचे दिसून आले

आज लाखेवाडी येथील लाखेवाडी-खाराओढा रस्त्याचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रस्त्यासाठी लेखाशिर्ष 30-54 निधीतून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे व त्यासाठी 25 लक्ष रुपये निधी कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर केले आहे.

यावेळी यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव नाईक, वसंत नाईक, सखाराम थोरवे, प्रभाकर खाडे, किसन जाधव, विष्णू जाधव, माजी उपसरपंच आप्पासो ढोले, रवींद्र पानसरे, पोलीस पाटील रामचंद्र निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश निंबाळकर, वामन निंबाळकर, शिवाजी घोगरे, बापूराव ढोले, रामचंद्र नाईक, पांडुरंग माने, काशिनाथ अनपट, धनंजय गिरमे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D