बारामती शहर होरपळला! पारा ४१ अंशांवर; दुपारी १२ ते ४ बाहेर पडू नका!
दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.

बारामती शहर होरपळला! पारा ४१ अंशांवर; दुपारी १२ ते ४ बाहेर पडू नका!
दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतच आहे. बुधवारी (१५) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१, अंश सेल्शियसची नोंद झाली आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.
शहरात सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवत होता. दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली. बाहेर पडणारे नागरिक टोपी, स्कार्फ, सनकोट तसेच गॉगलचा वापर करून उन्हापासून बचाव करत असल्याचे दिसून आले.
उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी शहरातील रसवंतीगृह, थंड पेयांची दुकाने आणि आईस्क्रीम पार्लर्स येथे नागरिकांची गर्दी वाढली होती. दुसरीकडे वातानुकूलन यंत्रे, कूलर आणि पंख्यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






