भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला

पदक वितरण सोहळ्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या भावना दाटून आल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला

पदक वितरण सोहळ्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या भावना दाटून आल्याचे पाहायला मिळाले.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. त्याने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिलं सुवर्ण पदक आहे. दरम्यान, पदक वितरण सोहळ्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा नीरजच्या भावना दाटून आल्याचे पाहायला मिळाले.

पदक वितरण सोहळ्यात, विजेत्या खेळाडूंच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवलं जातं. भारताच्या राष्ट्रगीताला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नीरजचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. दरम्यान, नीरज चोप्राचे हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. त्याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं.

नीरजने दिवंगत मिल्खा सिंगची अखेरची इच्छा पूर्ण केली

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूने पदक जिंकावी, अशी इच्छा मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा नीरज चोप्रा याने पूर्ण केली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

जर्मन प्रशिक्षकाकडून घेतली ट्रेनिंग –

नीरज चोप्रा हा भालाफेकचा सराव जर्मन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात करत आहेत. जर्मनचे क्लाउस बार्तोनित्स हे त्याचे प्रशिक्षक आहेत. क्लाउस यांच्या मार्गदर्शनात नीरज चोप्राच्या कामगिरीत दिवसागणित सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

वजन कमी करण्यासाठी आला आणि भालाफेकपटू बनला

नीरज चोप्रा हरियाणाचा पानीपत जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याला आपलं वजन कमी करायचे होते. यामुळे तो अॅथलिटिक्समध्ये आला. त्यानंतर त्याने ग्रुप एज स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. यात त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. यानंतर नीरजने भालाफेकमध्ये करियर केलं. 2016 मध्ये त्याने इंडियन आर्मी जॉईन केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!