स्थानिक

मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सेवा संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका चे व विविध उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

मराठा सेवा संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

सेवा संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका चे व विविध उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती बुधवार दि.12 जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे साजरी करण्यात आली.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे,शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्तीत होते.

या वेळी मान्यवरच्या शुभहस्ते बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने जिजाऊ वंदना साजरी करण्यात आली व बारामती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी सचिन सातव व संचालक पदी विजय गालीदे, आदेश वडुजकर,शिरीष कुलकर्णी,,नामदेवराव तुपे,देवेंद्र शिर्के आदी ची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सेवा संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका चे व विविध उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. जिजाऊ सेवा संघाच्या वतीने स्वागत व आभार प्रदर्शन करण्यात आले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले

Related Articles

Back to top button