महागाईचा भडका; घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला; किंमत पोचली 1 हजाराच्या टप्यात
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे
महागाईचा भडका; घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला; किंमत पोचली 1 हजाराच्या टप्यात
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे.
नवी दिल्ली,प्रतिनिधी
घरगुती सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे. आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे आता मुंबईत 14.2 किलोंचा सिलिंडर 1000 रुपयांना मिळणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं अक्षरशः मोडले आहे.ही वाढ आज शनिवार 7 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत 14.2 किलोग्रॅम डॉमेस्टिक LPG सिलेंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मागील वेळी 22 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली होती. तर एप्रिलमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.
एका आठवड्यापूर्वी 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या किमती लागू झाल्यानंतर दिल्लीत 1 मेपासून 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 2253 रुपयांवरुन 2355.50 रुपये झाल्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात उर्जेची मागणी वाढते आहे. परंतु मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.