आमदार रोहित पवारांची विठ्ठल थोरातांकडून ‘हजामत’ सोशल मेडियावर फोटो व्हायरल…

रोहित पवारांनी भेटीचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आमदार रोहित पवारांची विठ्ठल थोरातांकडून ‘हजामत’ सोशल मेडियावर फोटो व्हायरल…

रोहित पवारांनी भेटीचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी हॉटेलांपासून ते हेअर कटिंग सलूनपर्यंत अनेक गोष्टी खुल्या झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी खर्डा येथील त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला. कोरोनामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा लक्षात घेता हेअर कटिंग सलून बंद ठेवण्यात आले होते.

त्यामुळे येथे काम करणाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आता पुन्हा सर्व सुरू होत असल्याने आमदार रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघातील सलून चालकांना भेट दिली. यावेळी भेटीचे काही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने त्यांनी विठ्ठल थोरात यांच्या सलूनमध्ये ट्रिमिंग करुन घेतलं. याशिवाय येथील कारागिरांना सुरक्षा किटही दिलं. याबाबतचे काही फोटो त्यांनी फेसबुवर शेअर केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की…

‘सरकारने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्याने #KJIDF मार्फत माझ्या मतदारसंघातील सर्व सलून चालकांना त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येतंय. आज खर्डा इथंल्या सलूनमधील कारागिरांना सुरक्षा किट दिलं असता, यावेळी अनेक दिवसांनी विठ्ठल थोरात यांच्या सलूनमध्ये ट्रिमिंग केलं. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आपल्याला अधिक जागरूक रहावं लागेल. या पार्श्वभूमीवर सर्वच सलूनमधील कारागिरांनी स्वतःसह ग्राहकांच्याही आरोग्यासंदर्भात योग्य खबरदारी घ्यावी!’

 

Related Articles

Back to top button