स्थानिक

बारामतीत संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती साधेपणाने साजरी

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांत, शिस्तबद्ध व साधेपणाने पार पडला.

बारामतीत संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती साधेपणाने साजरी

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांत, शिस्तबद्ध व साधेपणाने पार पडला.

बारामती वार्तापत्र 

रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती बारामती तालुक्यातील कसबा, बारामती येथील समाजमंदिरात अतिशय साधेपणा आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी समाजमंदिरात स्थापित असलेल्या संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करत त्यांच्या समतेच्या, मानवतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या संदेशावर प्रकाश टाकला.

याच कार्यक्रमादरम्यान कै. आदरणीय अजितदादा पवार यांना बारामती तालुक्यातील चर्मकार समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याची आठवण उपस्थितांनी काढली. दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांत, शिस्तबद्ध व साधेपणाने पार पडला. समाजातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुता आणि संतांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D