माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बारामतीत पवार कुटुंबियांवरच नेम धरला,जरंडेश्वरचा खरा मालक कोण अजित पवार यांनी सांगावे!
अजित पवार आम्ही तुमच्या गुंडांना दमडीची किंमत देत नसल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बारामतीत पवार कुटुंबियांवरच नेम धरला,जरंडेश्वरचा खरा मालक कोण अजित पवार यांनी सांगावे!
अजित पवार आम्ही तुमच्या गुंडांना दमडीची किंमत देत नसल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत सोमय्या म्हणाले, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जरंडेश्वर शुगर मध्ये रूपांतर होताना तब्बल 17 कंपन्यांमध्ये सातत्याने स्थलांतर होत गेल्याचे दिसते. याचा खरा मालक अजूनही आम्हाला सापडलेला नाही आणि याचे उत्तर फक्त अजित पवार हेच देऊ शकतात. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे लक्ष वेधू पाहताहेत.
जरंडेश्वर येथे गुंडगिरी करत माझ्या हाताला धरून ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगरक्षक व पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे, असे सांगून अजित पवार आम्ही तुमच्या गुंडांना दमडीची किंमत देत नसल्याचे भाजपा नेते किरीट सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘जरंडेश्वर‘च्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी बारामतीत
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा व परिवहन मंत्री अनिल परब यांचे तत्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी सोमैया आज बारामतीत होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.
यानंतर त्यांनी बारामतीतील जळोची भागातील बजरंग खरमाटे यांच्या गॅलेक्सी या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बजरंग खरमाटे यांच्या राज्यभरात 42 बेनामी व नातेवाईकांच्या नावाने मालमत्ता असून त्याची मालमत्ता बाजार मूल्यानुसार 743 कोटींचा असल्याचा दावा केला.
‘महाराष्ट्राला लुटण्याचे धंदे बंद करावेत‘
अली बाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर या आपल्या सहयोगींकडून शिकावे, असा घणाघात ठाकरे आणि पवारांवर केला. संजय राऊत यांनी गुपचूप रात्री पावणेदहाच्या सुमारास ईडी कार्यालयाच्या मागील दाराने आत जाऊन चोरीचे ५५ लाख रुपये परत केले. तर नार्वेकर यांनी केंद्राची टीम आल्याचे लक्षात येताच आपला अनधिकृत बंगला नोटीस येण्याच्या आधीच पाडल्याचे सोमैया म्हणाले.
सोमय्या हे ईडीचे प्रवक्ते आहेत असा आरोप केला गेला होता, या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ज्यांची भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून काढली. ते लोक हा भ्रष्टाचार झाला नसल्याचे का सांगू शकत नाहीत? जर त्यांना आम्ही ईडीचे प्रवक्ते आहोत वाटत असेल त्यांनी कोर्टात जावे.