माय रमाई फाउंडेशन च्या वतीने बारामती-दौंड-इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
इंदापूरमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय
माय रमाई फाउंडेशन च्या वतीने बारामती-दौंड-इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
इंदापूरमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
माय रमाई फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेची आढावा बैठक इंदापूर मध्ये शनिवार दि.०५ रोजी संस्थापक अध्यक्ष अमर चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षा तथा इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अक्षय मखरे, सुरेश मखरे, विशाल मखरे, नवनाथ मखरे, अनार्य मखरे उपस्थित होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थापक अध्यक्ष अमर चौरे यांनी तर माता रमाई यांच्या प्रतिमेस नगरसेविका राजश्री मखरे यांनी पुष्पहार अर्पण करुन बैठकीस सुरवात करण्यात आली.या बैठकी मध्ये बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील सर्व धर्मिय वधू-वरांचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच या मेळाव्याची नियोजित तारीख संघटनेच्या वतीने घोषित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक मखरे यांनी केले.