स्थानिक

मा. श्री जवाहर शाह (वाघोलीकर) यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

" एक अष्टपैलू व्यक्तिमत्व  जवाहर शाह वाघोलीकर '- गौरवग्रंथाचे प्रकाशन."

मा. श्री जवाहर शाह (वाघोलीकर) यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

” एक अष्टपैलू व्यक्तिमत्व  जवाहर शाह वाघोलीकर ‘- गौरवग्रंथाचे प्रकाशन.”
बारामती वार्तापत्र

बारामती गेली पाच दशके शैक्षणिक सामाजिक सहकार आणि उद्योग क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री जवाहर शाह वाघोलीकर )यांच्या प्रदीर्घ उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहस्त्रचंद्रदर्शन  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सुप्रसिद्ध उद्योजक व श्री. दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र कुंथलगिरीचे अध्यक्ष मा. श्री. अरविंद रावजी दोशी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर  म्हणाले की,”जवाहर भाई शाह वाघोलीकर हे एक अतुलनीय व्यक्तिमत्व आहे अनेकांत एज्युकेशन सोसायटी ही एक सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचा मला आनंद होत आहे १९६०साली केलेल्या मोठ्या धाडसातून उत्तम भौतिक सुविधा व दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विकासाचा ध्यास घेऊन ही शिक्षणसंस्था नावारूपाला आणण्यात जवाहरभाईंचा सिंहाचा वाटा आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वांच्या तुलनेत सर्वोत्तम असल्याचा दाखला आपल्याला मिळतो. उत्कृष्ट दर्जा राखत उत्तम व दर्जेदार शैक्षणिक संस्था त्यांनी उभारल्या हे खूप मोठे कार्य आहे.असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
श्री. दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी चे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योजक  मा. श्री. अरविंद रावजी दोशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. आपल्या अध्यक्षीय  भाषणात ते म्हणाले की,” सर्वांगीण कर्तृत्ववान, नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हा एक अविस्मरणीय क्षण आहे. जवाहरभाईंचे योगदान भव्य असून अनेकान्त शैक्षणिक संस्थांचा सर्वत्र नावलौकिक वाढविण्यात जवाहर भाईंचा मोठा वाटा आहे. अनेकांत शैक्षणिक संस्थांचे जाळे वाखाणण्यासारखे आहे. जवाहर शाह (वाघोलीकर )हे केवळ अडतीच्या व्यवसायावर थांबले नाहीत तर उत्कृष्ट शिक्षण संस्थांचा विस्तार करण्याचे उत्तम कार्यकर्तृत्व त्यांनी केले. प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, धाडसीपणा, संघटनकौशल्य, लोकसंग्रहवृत्ती ,विनोदीशैली (सेन्स ऑफ ह्यूमर , कुटूंबवत्सलता,साहित्य व शास्त्रीय संगीताची आवड या अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे जवाहर शाह (वाघोलीकर) यांच्या नेतृत्वगुणांचा ठसा उमटलेला दिसतो. त्यांनी केलेले उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य आणि सांभाळलेली जबाबदारी फार मोठी आहे. यापुढेही त्यांच्या सामाजिक कार्यात उत्तरोत्तर भर पडो ही सदिच्छा!”असे प्रतिपादन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना मा. जवाहरभाईं यांनी असे म्हटले की, “केवळ आमच्या पूर्वजांच्या पाठिंब्यामुळे आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व काम मी करू शकलो. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कॉलेज निर्माण करण्यामध्ये गव्हर्निंग कौन्सिलच्या सर्व सदस्यांचे श्रेय मोलाचे आहे.”

मा. जवाहरभाई शाह (वाघोलीकर) यांची सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ग्रंथतुला करण्यात आली. या निमित्ताने वाचनीय व दुर्मिळ ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट देऊन वाचन संस्कृतीचा संदेश देण्यात आला.

मा.जवाहरभाईंना मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्राचे लेखन व वाचन सौ.सुषमा संगई यांनी केले.

सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त जवाहर शाह (वाघोलीकर) यांच्या उल्लेखनीय ,समाजाभिमुख प्रदीर्घ सेवाभावी कार्यकर्तृत्वाचा आलेख रेखाटणारा देखणा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. “जवाहर शाह वाघोलीकर  : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व” या गौरवग्रंथाचे प्रमुख  संपादक प्राचार्य डॉ.अविनाश जगताप तर कार्यकारी संपादक म्हणून सौ.सुषमा संगई यांनी काम पाहिले .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री अरविंद रावजी जोशी यांचा सत्कार सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या गौरव समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर) यांच्या हस्ते करण्यात आला. तर अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे मा. श्री चंद्रगुप्त शहा वाघोलीकर यांच्या हस्ते श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, जयसिंगपूर स्थानिक समिती व अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ,अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल ,अनेकांत कॉलेज ऑफ फार्मसी, अनेकांत ॲकॅडमी या संस्थांच्या वतीने मा. जवाहर (वाघोलीकर) यांचा सत्कार करण्यात आला. जवाहरभाई यांना वाई येथील सुप्रसिद्ध पेढ्याचे व्यापारी श्री.खामकर बंधू यांनी पेढ्याचा हार घालून आगळा वेगळा सत्कार केला.
याप्रसंगी सुनील शहा, सुभाष शहा वाघोलीकर, चंद्रगुप्त शाह वाघोलीकर,  चंद्रवदन शहा (मुंबईकर), डॉ. जयप्रकाश शहा ,सोनिक शहा, सत्यजित शहा (पंदारकर)  ,विद्युतकुमार शहा, राहुल शाह  वाघोलीकर  ,   मा. अजित देशपांडे, अनेकांत मॅनेजमेंट स्टडीज् चे प्राचार्य डॉ.धनंजय बागुल, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. प्रणाली वडेर, कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. दर्शन शहा ,जयसिंगपूर येथील डॉ.सुभाष अडदंडे ,डॉ. महावीर अक्कोळे, धवलकुमार पाटील, पद्माकर पाटील,  ,मा. चंदरराव तावरे, मा. पृथ्वीराज जाचक,जयश्रीभाभी  सातव,मंगलभाभी शहा (सराफ),
सेवानिवृत्त प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  सर्व आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. किशोर शेठ शहा ,सौ.पौर्णिमा तावरे, सौ.भारती मुथा ,डॉ.सुभाष अडदंडे, डॉ.महावीर अक्कोळे, सौ किरणताई शहा ,ॲड.अशोक प्रभुणे ,  सौ. रुपाली शहा,  श्री. दिलीप शिंदे ,माजी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर ,सौ. सुनिता शहा , सुर्यकांत गादीया , निलेश दोशी या मान्यवरांनी जवाहरभाईंविषयी मनोगते व्यक्त केली.
अनेकांत परिवाराकडून शनिवार दिनांक ५ जुलै ते शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ या पंधरवड्यात सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त विविध सेवाभावी, शैक्षणिक, सामाजिक, प्रेरणादायी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात’ कीर्तावणी वारी आडवाटेच्या विठोबाची’, ८१ कि.मी. ‘रन फॉर हेल्थ दिवेघाट ते टी.सी.कॉलेज’ ,’भव्य महारक्तदान शिबीर’ ,आरोग्यविषयक व्याख्याने- -डॉ. हर्षवर्धन व्होरा, डॉ.सौरभ दोशी, डॉ.जे. जे. शहा व डॉ. सौ.अंबर्डेकर यांची  मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. तसेच रक्ततपासणी व ई.सी.जी. परीक्षण व  वैद्यकीय तपासणी शिबीर अनेकांत संकुलातील संपूर्ण स्टाफ साठी घेण्यात आले. इंग्रजी विभागातर्फे म्युझिकॅलीट ३ हा काव्यगायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.  वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘वृक्ष वितरण’Sapling ,बीबीएसीए विभागाच्यावतीने ‘सायबर सुरक्षा,’ संरक्षण शास्त्र विभागातर्फे ‘कारगिल युद्धात सहभागी सैनिकांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम’ घेण्यात आला. ‘गौरवग्रंथ प्रकाशन’, ‘ग्रंथतुला’ इत्यादी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी वाढदिवस उत्साहात संपन्न झाला .

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले.सहस्रचंद्रदर्शन सोहळा गौरव समितीचे अध्यक्ष व अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री मिलिंद शाह  वाघोलीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय शेंडे व सौ.सुषमा संगई यांनी केले .
श्री चंद्रगुप्त शाह (वाघोलीकर )यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button