आपला जिल्हा

‘मेलोडी’ वाटून जल्लोष! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत अनोखा आनंदोत्सव

काही काळ भिगवण चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘मेलोडी’ वाटून जल्लोष! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत अनोखा आनंदोत्सव

काही काळ भिगवण चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

बारामती वार्तापत्र 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामती शहरात विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. भिगवण चौकात एकत्र जमलेल्या उपस्थितांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला, तसेच घोषणाबाजी करत जल्लोष केला.

या वेळी कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात एकमेकांचे अभिनंदन करत राजीनाम्याचे स्वागत केले. काही काळ भिगवण चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर उपस्थितांनी आनंद व्यक्त करत छायाचित्रे आणि व्हिडिओही टिपले.

या अनोख्या सेलिब्रेशनची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. चॉकलेट वाटून आनंद व्यक्त करण्याच्या वेगळ्या पद्धतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून, या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Back to top button