शैक्षणिक

म.ए.सो.कै.ग.भि.देशपांडे विद्यालय, बारामती. येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव’ समारंभ उत्साहात संपन्न.

एकुण ६९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

म.ए.सो.कै.ग.भि.देशपांडे विद्यालय, बारामती. येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव’ समारंभ उत्साहात संपन्न.

एकुण ६९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि.देशपांडे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संस्थेचे नियामक मंडळ सदस्य व शाला समिती अध्यक्ष मा. अजय पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे, प्रशालेचे माजी विद्यार्थी आय. आर. एस. मा. श्री. पुष्कर घोळवे, प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. दीपक पावसकर,यांच्या उपस्थितीत पार पडला.

विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.९०% तर बारावीचा कला शाखेचा ८८.००%, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल १००% इतका लागला होता. या परीक्षेत नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी , राज्य शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, एन. एम. एम. एस. परीक्षेतील विद्यार्थी, असे उत्तुंग यश प्राप्त करणारे एकुण ६९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आज विद्यार्थ्यांनी “मोबाईल पासून दूर राहून सतत वाचन करावे. ध्येय नेहमी मोठे ठेवून ध्येयवेडे व्हावे, तसेच कोणतेही काम करा पण ते देश हाच देव मानून करा” असा संदेश प्रमुख अतिथी मा. पुष्कर घोळवे यांनी दिला.

प्रशालेतील विद्यार्थी राज्य पातळीवर यश प्राप्त करीत आहेतच आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून ‘मएसो’ चा नावलौकिक वाढवावा असे गौरवोद्गार महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी काढले.

‘मएसो’ मध्ये आपले ‘कर्तृत्व’ दाखवून सुसंस्कृत विद्यार्थी घडत आहेत. अनेक विद्यार्थी देश पातळीवर ‘नेतृत्व’ करत आहेत. त्यांनी स्वच्छ प्रशासनाचा आदर्श निर्माण करावा व ज्या विद्यार्थ्यांना आज उत्तुंग यश मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले यश यापुढील आयुष्यातही टिकवून ठेवावे असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अजय पुरोहित यांनी केले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. दीपक पावसकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. धनंजय मेळकुंदे यांनी केले. याप्रसंगी प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य श्री. राजीव देशपांडे, शाळा समन्वयक श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. धनंजय मेळकुंदे, उपमुख्याध्यापक श्रीमती सविता हिले, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे, हरिभाऊ गजाननराव देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर, पर्यवेक्षक श्री. शेखर जाधव, श्री. दिलीप पाटील, श्री. अनिल गावडे हेही उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. मोहिनी देशपांडे यांनी केले तर आभार सौ. अपर्णा शिंदे यांनी मानले.

Related Articles

Back to top button