रविराज तावरे पुढिल उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर ला… प्रकृती स्थिर.
शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुसज्ज व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर गिरीराज हॉस्पिटलमध्ये असल्याने रविराज तावरे यांना तेथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरीराज हॉस्पिटलमध्ये प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील सर्व व्यवस्था तत्परतेने तयार झाली होती.

बारामती वार्तापत्र
बारामती राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर माळेगाव येथील संभाजीनगर भागात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने येथील कार्यकर्त्यांनी बारामती हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथून त्यांना गिरीराज हॉस्पिटल येथे हलविण्यात आले डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णास कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी तावरे यांना पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामतीत दहा बाटल्या रक्त भरून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बारामतीतील डॉक्टरांनी उपचारासाठी दाखवलेली तत्परता बारामतीतील डॉक्टरांसाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व नागरिक डॉक्टरांचे कौतुक करत आहेत.