सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार विरोधकांनी करावा – आमदार रोहित पवार

ट्विट करत रोहित पवारांची साधला विरोधकांवर निशाणा

सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार विरोधकांनी करावा – आमदार रोहित पवार

ट्विट करत रोहित पवारांची साधला विरोधकांवर निशाणा

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा.अस ट्वीट करत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी आणि सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असं सूचक ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू असल्याचं पवार यांना ट्विटमधून सूचित केलं आहे.

रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी घडलेल्या गोष्टींबाबतचं निरीक्षणही नोंदवलं आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतची माहिती मीडियाला दिली. मात्र, त्याचवेळी पवारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात आले. पुरावे म्हणून देशमुखांचे व्हिडीओही दाखवण्यात आले. पत्रकारांकडे हे सर्व मुद्दे आले कुठून?, त्यांना कोण माहिती पुरवत होतं? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवारांची पीसी सुरू होताच भाजपचे सर्व नेते सोशल मीडियावर सक्रिय झाले होते. पवारांच्या मुद्द्यांवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत होते. तसेच बरीच माहितीही पुरवत होते. यामागे भाजपचा मोठा प्लान दिसतोय, असं पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button