राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी तरटगावसाठी मंजूर केलेल्या निधीतून विविध विकासकामांची उद्घाटने संपन्न
राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाखोंचा निधी मंजूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी तरटगावसाठी मंजूर केलेल्या निधीतून विविध विकासकामांची उद्घाटने संपन्न
राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाखोंचा निधी मंजूर
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी तरटगाव ग्रामपंचायतीसाठी हर घर जल या योजनेतून ३४ लाख,आमदार फंडातून ६ लाख याच बरोबर पुनवर्सन मधून भरीव निधी मंजूर केला आहे.याच निधीतून तरटगावमध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची उद्घाटने बुधवारी ( दि.८ ) राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटीचे संचालक मधुकर भरणे,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले,पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
याप्रसंगी बोलताना मार्केट कमिटीचे संचालक मधुकर भरणे म्हणाले की,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून भविष्यात तरटगाव येथील ग्रामस्थांच्या अडचणी तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.तसेच जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी गावातील विविध अडचणी कशा पद्धतीने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवल्या जातील यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब व्यवहारे, नानासाहेब नरुटे, संजय देवकर, धनंजय तांबिले,गावचे सरपंच पोपट माने ,उपसरपंच अनंता ननवरे,दादासाहेब भांगे,हनुमंत भांगे,रवींद्र भांगे,दत्तात्रय सरडे, प्रकाश निकम,राजेंद्र ननवरे,संतोष ननवरे व सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.