राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त निरनिमगाव मध्ये गरजूं निराधार माता-भगिनींना अन्नधान्य किट वाटप..!!
१०५ महिलांचे विविध शासकीय योजनांचे लाभाचे मिळवून देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज त्यांच्या हस्ते भरून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त निरनिमगाव मध्ये गरजूं निराधार माता-भगिनींना अन्नधान्य किट वाटप..!!
१०५ महिलांचे विविध शासकीय योजनांचे लाभाचे मिळवून देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज त्यांच्या हस्ते भरून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधी: बारामती वार्तापत्र
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून(दि.१२ जून २१) रोजी निर निमगाव गावामध्ये अनंतराव पवार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे यांच्या माध्यमातून गावातील गरजू निराधार माता-भगिनींना अन्नधान्य कीट चे वाटप करण्यात आले.तसेच या निमित्ताने निर निमगाव मधील जवळपास १०५ महिलांचे संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आदी विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज भरण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की,आज माझ्या गरीब,वंचित,विधवा व निराधार माता भगिनींना शासनाचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्पर राहून कामे करावीत,यामध्ये कोणी एजंटगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास अशांची हयगय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा त्यांनी दिला.यांस उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.यावेळी भरणे यांनी स्वतः माता-भगिनींकडे जाऊन त्यांच्या अडी-अडचणींची आपुलकीने विचारपूस करून आपल्या तक्रारींचे ताबडतोब निरासन करण्याचा शब्द दिला.तसेच कोरोना महामारी मध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटूंबीयांचे सांत्वन ही भरणे यांनी केले.
तसेच कोरोना काळामध्ये अडचणीत आलेल्या निर निमगाव गावच्या अंजीर साळुंखे या लोककलावंतास दत्ताजीराव घोगरे यांनी अनंतराव पवार प्रतिष्ठान च्या वतीने छोटीसी मदत म्हणून राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते अंजीर साळुंखे यांना चेक चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिनदादा सपकळ, राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष तसेच तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अतुल शेठ झगडे,उमेश दादा घोगरे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,नवनाथ आबा रूपनवर,श्रीकांत बापू बोडके,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम भैय्या निंबाळकर, तहसिलदार ठोंबरे साहेब,गटविकास अधिकारी परीट साहेब,दादासाहेब क्षिरसागर, पांडुरंग डिसले, शब्बीर काझी, रणजित घोगरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.