स्थानिक

बारामती लिनेस क्लबच्या अध्यक्षपदी राधिका जाचक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा प्रारंभ

बारामती लिनेस क्लबच्या अध्यक्षपदी राधिका जाचक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा प्रारंभ

बारामती वार्तापत्र

बारामती येथील लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी लिनेस राधिका जाचक, सचिवपदी लिनेस रिनल शहा, खजिनदारपदी लिनेस सीमा चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली. पास्ट डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट लिनेस धनश्री गांधी यांच्या हस्ते शपथ व पद‌ग्रहण समारंभ नुकताच झाला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, महिला सबलीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्यासह प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षणाची शपथ या वेळी सर्व सदस्यांनी घेतली.

यावेळी माजी नगराध्यक्षा लिनेस पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव लिनेस अँड. नीलीमा गुजर, माजी व्हाईस डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट लिनेस उज्वला शिंदे, पास्ट डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट लिनेस सुमन जाचक, रिजन कॉर्डिनेटर लिनेस उल्का जाचक, माजी खजिनदार लिनेस मनीषा खेडेकर, जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा लिनेस स्वाती ढवाण आदी मान्यवर उपस्थित होत्या. या प्रसंगी पौर्णिमा तावरे, उज्वला शिंदे, नीलीमा गुजर व सुमन जाचक यांनी मार्गदर्शन केले.

सूत्र संचालन लिनेस निधी मोता व लिनेस कीर्ती पहाडे यांनी केले. लिनेस रिनल शहा यांनी आभार मानले.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D