राज्याच्या कृषी सचिवांची बारामतीस भेट
तालुक्यातील विविध शेती प्रकल्पांची पाहणी
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनीवारी बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील तालुका फळरोप वाटीका, माळेगाव खुर्द येथील भाऊसाहेब फूंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत केलेली मोसंबीची लागवड व ‘विकेल ते पिकेल’ या योजनेअंतर्गत माळेगाव येथील प्रतिभा फार्मस व बलराम महिला शेतकरी स्वयंसहायता गट या ठिकाणचा पाहणी दौरा केला.
या वेळी कृषी विभागाचे आयुक्त धिरज कुमार, संचालक (फलोत्पादन), महाराष्ट्र राज्य कैलास मोते, विभागीय कृषि सहसंचालक पुणे बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी बारामती बालाजी ताटे, तालुका कृषि अधिकारी बारामती दत्तात्रय पडवळ आदी उपस्थित होते.
या दौ-यात डवले यांनी माळेगाव येथील मोसंबी लागवडीची पाहणी करुन ,सोयाबीन काढणीनंतर कमी मशागत व तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याच सरीवर हरभरा लागवड केलेल्या अनोख्या प्रयोगाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सोयाबीन व हरभरा बीजोत्पादन कार्यक्रमाबाबत व बलराम महिला शेतकरी स्वयंसहायता गटासोबत चर्चा व सखोल मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम मंडळ कृषि अधिकारी बारामती चंद्रकांत मासाळ, जाधव, कृषि पर्यवेक्षक भानवते, गाढवे, भोसले, चव्हाण, धोत्रे, सचिन खोमणे, बाजीराव कोळेकर, कृषि सहायक कदम यांनी विशेष परिश्रम घेवून यशस्वी केला.