निलेश राणेंचे बालिशपणाचे वक्तव्य
किशोर मासाळ यांनी दिले प्रत्युत्तर
बारामती वार्तापत्र
अजित दादा पवार यांच्या नावावर ग्रामपंचायत सदस्यही निवडून येत नाही. त्यांनी काय विकास कामे केली याविषयी माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी कडक शब्दात पत्र लिहून त्यांना बारामती भेटीचे निमंत्रण दिले आहे.
आपण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव असल्यामुळे मीडियाने तुमच्या वक्तव्याला महत्त्व दिले आहे. मात्र आपण ज्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे बरळत असता त्यामुळे राणे साहेबांना देखील आपल्या राजकीय अज्ञानामुळे वाईट वाटत असेल. आपण कधीही घराचे दार उघडून बाहेर पडला नसाल त्यामुळे अजितदादांनी राज्यभर केलेले सामाजिक काम आपल्याला दिसत नसेल. सततच्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाला असल्याने कोणत्या झिंगेत आपण वक्तव्य करता,थोडे झिंग बाजूला ठेवून वेळात वेळ काढून बारामती पाहण्यासाठी आपण यावे. आपल्या डॉक्टर डिग्रीच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल.
बारामतीत आल्यानंतर कधीही न पाहिलेल्या वास्तु आणि इथल्या नागरिकांच्या सुख सोयी पाहून जी झींग आपल्याला येईल ती खरोखरच पाहण्यायोग्य असेल. बारामतीच्या विकासाचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले बंधू आमदार नितेश राणे यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेतली असती तर असे बालिशपणाचे वक्तव्य आपण केलेच नसते.
तसेच आपण स्वतः महाराष्ट्रातील जनतेसाठी काय योगदान दिले हेदेखील राज्याला एकदा समजावे. बारामती फिरून दाखवण्यासाठी अजित दादांनी निवडून आणलेले ग्रामपंचायत सदस्य हजर .असतील असेही त्यांनी निलेश राणे यांना आवाहन करत पत्रात बारामती ला येण्याचे निमंत्रण दिलेआहे.