आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातून मोठा विजय

१०१ पैकी ९१ मते मिळाली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातून मोठा विजय

१०१ पैकी ९१ मते मिळाली आहेत.

बारामती वार्तापत्र

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच निकालात निळकंठेश्वर पॅनलने विजयी सुरुवात केली आहे. ब वर्गातून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय मिळवला आहे. त्यांना या निवडणुकीत १०१ पैकी ९१ मते मिळाली आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर माळेगावच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली.

या वर्गात 99 टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना 101 त्यापैकी तब्बल 91 एवढी मते पडली तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना 10 एवढीच मते मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दणदणीत विजय झाल्याने सभासद व कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव राज्यभर बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उतरले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. आज मतमोजणी प्रक्रिया प्रक्रिया पार पडत आहे. तर ‘ब’ वर्गातून अजित पवार विजयी झाले आहेत. आता पॅनलचा निकालाला अद्याप वेळ असून काही वेळाने तो निकालही समोर येईल.

Related Articles

Back to top button