इंदापूर

लासुर्णे पाठोपाठ वडापुरी येथील पेट्रोल पंपावर तब्बल ७.५० लाखाच्या डिझेलची चोरी

डिझेल चोरी प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लासुर्णे पाठोपाठ वडापुरी येथील पेट्रोल पंपावर तब्बल ७.५० लाखाच्या डिझेलची चोरी

डिझेल चोरी प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील इंदापूर बारामती रस्त्यावर असलेल्या कुणाल ऑटोलाईन्स या पेट्रोल पंपावरील टॅंकमधून चौदाशे लिटर डिझेल चोरट्यांनी चोरण्याची घटना ताजी असतानाच वडापूरी (ता.इंदापूर) येथे नव्याने काम सुरू असलेल्या राऊत पेट्रोल पंपातील डीझेल टाकीमधील ७ लाख, ५१ हजार रूपये किमतीच्या डीझेलची अज्ञात चोरट्यांने चोरी केली असल्याची फिर्याद निखील नंदकिशोर राऊत.(वय ३४) रा.अकलुज, ता.माळशिरस, जि. सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

इंदापूर तालुक्यातील मौजे वडापूरी गावचे हद्दीत अकलुज येथील निखील राऊत यांचे मालकीचे नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असुन सदर पंपाचे कामकाज हे फीर्यादी यांचे बंधु निरज नंदकीशोर राऊत हे अकलुज येथुन येवुन जावुन पहात असतात. पेट्रोलपंप चालु नसल्याने पंपावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची सोय नाही परंतु वाॅचमन असतो. दिं.१२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता निरज राऊत यांनी सदर पेट्रोल पपांच्या डीझेल टाकीचे गेज डिपराॅडने ( टाकीतील डीझेल मोजण्याचे साधन) चेक केले असता १३७.९ म्हणजेच १४ हजार ९८९ लिटर इतके भरले होते.त्यानतर दि.१४ रोजी वरील पद्धतीने डीझेल चेक केले असता टाकीतील डीझेल हे ५८.०० इतकेच म्हणजे फक्त ४ हजार ८४२ लिटर आढळुन आल्याने टाकीत १० हजार १४७ लिटर डीझेल कमी असल्याचे दीसुन आल्याने निरज राऊत यांना डीझेल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

सदरील प्रकरणी निखिल नंदकिशोर राऊत रा.अकलूज यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद दिली असून पुढील तपास पो.ह विनोद पवार करत आहेत.

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव, लासुर्णे पाठोपाठ वडापुरी पेट्रोल पंपामध्ये डीझेल चोरीची तीसरी घटना घडल्याने या माघे सराईत टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!