जनतेच्या हाकेला धावणारे नगरसेवक : सुनिल सस्ते …
अविरत निष्काम समाजसेवेची ‘सोळा’ वर्षे पूर्ण
बारामती वार्तापत्र
कायमच सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपली राजकीय, सामाजिक कारकीर्द सुरू करणारे , सलग चार पंचवार्षिक निवडणुकीत कधीही पराभवाचे तोंड न पाहिलेले,बारामतीतील प्रत्येक नागरिकाला आपलेसे वाटणारे, सर्वमान्य नगरसेवक मा.सुनील सस्ते यांची चालू पंचवार्षिक मधील चार वर्षे तर एकूण कारकीर्दीतील 16 वर्षे आज पूर्ण होतायेत त्याबद्दल थोडंस….
अजात शत्रू ,निर्भिड व्यक्तिमत्व, हाती घेतलेले काम तडीस नेणारे, विनम्र, प्रभावी नगरसेवक श्री. सुनील सस्ते हे प्रभाग क्रमांक 16 चे बारामती नगर परिषदेचे नगरसेवक आहेत. उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ही प्रामाणिकपणाची खुणगाठ मनात ठेवून काम करणारे सुनील सस्ते सामान्य नागरिकाला काही अडचण आली, संकट आले तर अगदी रात्री- अपरात्री मदतीला धावून जातात 24 तास आपला फोन चालू ठेवणारी केव्हाही फोन करा मदतीला हजर असं सांगणारी ही हस्ती रात्रंदिवस मदतीला उभी असते. कोरोनाच्या काळात लॉक डाऊन असताना अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देणे, रेमीडेसिवर इंजेक्शन मिळविण्यासाठी मदत करणे,अगदी पेशंटला दवाखान्यात दाखल करण्यापर्यंत सर्व गोष्टींची मदत करणे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली NXT डिजिटलच्या मदतीने पोचवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. सामान्य नागरिकाचे छोटे-छोटे प्रश्न असो की, नगरपालिकेतील इतर धोरण त्यामुळे लोकांची अडवणूक होईल, नुकसान होईल त्या विरोधात सतत आवाज उठवणे असो. यामध्ये शहरातील इंदापूर रोडवरील बाह्य मार्ग, देवकाते हॉस्पिटल ते शारदा नगर सेवा रस्त्यामुळे अनेक व्यवसायिकांची दुकाने, घरे बाधित होणार होती दोन्ही बाजूला साडेसात मीटर चा नवीन रस्ता होणार होता. त्यामुळे नुकसानीचा अंदाज घेऊन हा रस्ता रद्द करण्यासाठी उपोषणा पर्यंतच्या सर्व मार्गांचा अवलंब करून हा रस्ता रद्द केला.
बारामतीतील नागरिकांची दुहेरी टोलच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट हाही विषय त्यांनी योग्य पद्धतीने हाताळून बारामतीकरांची या लुटीतून मुक्तता केली. नगरपालिकेच्या नवीन हद्द वाडी मध्ये येणारी गावे, प्रभाग यांना नगरपालिकेच्या वतीने लाईटची किंवा ड्रेनेजची सोय केली नसताना नगरपालिका या ठिकाणच्या रहिवाशांकडून कराचे रूपाने आकारणी करत होती ती रक्कम जवळपास सात कोटीच्या आसपास होती. मात्र जी सेवा नगरपालिका देत नाही त्या सेवेच्या रूपाने नगरपालिका कर घेत होती. तो कर घेऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली व त्या ठिकाणी जनतेचा अंदाजे तीन कोटी रुपये कर नगरपालिकेला कमी करावा लागला.
नगरपालिकेचा कारभार थेट लोकांना माहिती व्हावा याकरिता नगरपालिकेच्या प्रत्येक मीटिंगमध्ये जनतेच्या वतीने प्रभावी बाजू मांडणे, सामान्य जनतेला नगरपालिकेच्या कामकाजाची माहिती व्हावी यासाठी ते सदैव तत्पर असतात.
मला ज्यांनी निवडून दिले त्यांची कामे करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते सतत जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देतात म्हणूनच जनतेला ते कायम हवेहवेसे वाटतात. येणाऱ्या काळात देखील तितक्याच जोमाने जनतेचा सेवक म्हणून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण हेच या सेवकाचे आद्यकर्तव्य राहील एवढं मात्र नक्की…
जनतेचा विश्वास हाच या सेवकाचा आत्मविश्वास…