विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत पर्यावरणाचीही काळजी; युगेंद्र पवारांच्या हस्ते स्टीलच्या बाटल्यांचे वाटप
प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी व्हावा, या उद्देशा

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत पर्यावरणाचीही काळजी; युगेंद्र पवारांच्या हस्ते बारामतीत स्टीलच्या बाटल्यांचे वाटप
प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी व्हावा, या उद्देशा
बारामती वार्तापत्र
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शारदा प्रांगण येथे झालेल्या कार्यक्रमात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नियमित स्वच्छ पाणी प्यावे आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






