शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्ष साठी कटिबद्ध: नामदेव लडकत

लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे स्नेहसंमेलन संपन्न

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्ष साठी कटिबद्ध: नामदेव लडकत

लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे स्नेहसंमेलन संपन्न

बारामती वार्तापत्र 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असताना मेडिकल, इंजिनिअरिंग क्षेत्रात लडकत स्कुल च्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली आहे गुणवत्ता व दर्जा च्या जोरावर विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन
लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे अध्यक्ष नामदेव लडकत यांनी केले.

मंगळवार २४ डिसेंबर रोजी लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे सचिव गणेश लडकत , प्राचार्य रामचंद्र वाघ, सेवानिवृत्त मुख्यधापक यू.एम.शिंदे,समनव्यक प्रफुल्ल आखाडे ,तानाजी गवळी व विद्यार्थी ,पालक व शिक्षकवृंद उपस्तीत होते.

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रयत्न करावेत .८ वी पासून प्रत्येक विद्यार्थ्यांना नीट,सी ए टी व जेईई साठी तयार करून घेतले जाते अत्याधुनिक तंत्रज्ञान च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील परिपूर्ण व सखोल ज्ञान दिले जात असल्याचे नामदेव लडकत यांनी सांगितले मोबाईल कामापूरता वापरा,आई वडिलांचे स्वप्न साकार करा, वेळेचे योग्य नियोजन करा,अभ्यास व मैदानी खेळ यांचा मेळ बसवा असा सल्ला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल सावळेपाटील यांनी सांगितले.

व्यवसना पासून दूर राहत आपले ध्येय पार करताना आई वडील, गुरुजन, जन्मभूमी व देशाला विसरू नका असे मा.मुख्यध्यापक यु. एम. शिंदे यांनी सांगितले.

उपस्थितांचे स्वागत गणेश लडकत व प्राचार्य रामचंद्र वाघ यांनी केले सूत्रसंचालन सुषमा चव्हाण व आभार प्रदर्शन तानाजी गवळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram