विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी संगीत व साहित्य महत्त्वाचे : प्रतिभा इनामदार
न्यू बाल विकास मंदिरचा १५ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी संगीत व साहित्य महत्त्वाचे : प्रतिभा इनामदार
न्यू बाल विकास मंदिरचा १५ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
बारामती वार्तापत्र
शाळेतील अनुभव खूप महत्त्वाचे असतात, त्यातून स्वतःचा स्वतःशी परिचय होतो. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे, नोट्स लिहाव्यात, कृतज्ञतेने वागावे, शालेय जीवनात मिळणारी संधी सोडू नये. तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी संगीत व साहित्य महत्वाचे असल्याचे मत संगीत विशारद सुप्रसिद्ध गायिका प्रतिभा इनामदार यांनी व्यक्त केले.
पिंपळी (ता. बारामती) येथील विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिरचा १५ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम गदिमा सभागृहात शनिवारी (दि.१४) पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभा गायकवाड उपस्थित होत्या.
यावेळी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमाताई गुजर, सदस्य डॉ. राजीव शहा, किरण गुजर, छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण व दिपाली ढवाण,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नवनाथ बनकर, सहसचिव विशाखा महेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या तनुश्री गोरे यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘फेस्टिवल : रंग जीवन के’ या नवीन विषयावर आधारित सुमारे ६०० विद्यार्थी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपले कलागुण सादर केले. भारतातील विविधतेतील एकतेचे वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वच धर्मातील महत्त्वाच्या सण – उत्सवांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या तनुश्री गोरे यांच्यासह लीला शेट्टी, माधुरी दिक्षित, रुपाली सावरे व फरीदा नबाब या शिक्षिकांनी सहकार्याची भूमिका बजावली. सदर कार्यक्रमासाठी लागणारे नेपथ्य व रंगमंच सजावट वृषाली साबळे व सचिन कुंभार यांनी केले, तर सूत्रसंचालन कविता मदने आणि नरेंद्र बळे यांनी केले.