स्थानिक

दि.२० जुलै पासून बारामतीतील लॉकडाऊन मध्ये शिथिलता येणार.

सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत चालू राहतील.

२० जुलै पासून बारामतीतील लॉकडाऊन मध्ये शिथिलता येणार.

गेल्या काही दिवसांपासून बारामतीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता.शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बारामती शहरात दि.१६ जुलै ते २३ जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

सुरवातीचे चार दिवस म्हणजे दि.१६ जुलै ते १९ जुलै दरम्यान शहरातील वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद होते.दरम्यान आता.

उद्या दि.२० जुलै ते दि.२३ जुलै दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत शहरातील सर्व किराणा दुकाने,सर्व किरकोळ व ठोक विक्रेते तसेच आडत भाजी मार्केट,फळ विक्रेते,आठवडी व दैनिक बाजार,फेरीवाले कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिकन-मटण,अंडी,मासे यांची विक्री करणारे दुकान देखील सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत चालू राहतील अस प्रशासनाने दि.१४ जुलै रोजी काढलेल्या आदेशा मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Check Also
Close
Back to top button