इंदापूर

शेतकरी आक्रोश मोर्चा – कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

दिनांक : १० जून २०२६ वेळ : सकाळी ९.३० वाजता

शेतकरी आक्रोश मोर्चा – कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

दिनांक : १० जून २०२६
वेळ : सकाळी ९.३० वाजता

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषिमंत्री स्वतः इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतानाही येथील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता आंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे येथे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानावर शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या शेतातील नुकसान झालेला ऊस, केळी, डाळिंब व इतर पिकांचे अवशेष कृषिमंत्र्यांना भेट म्हणून देऊन शासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त करणार आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि संताप शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

तरी सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, डिजिटल मीडिया प्रतिनिधी, छायाचित्रकार व पत्रकार बंधूंनी या आंदोलनास उपस्थित राहून शेतकऱ्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवावा, ही नम्र विनंती.

स्थळ : आंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे दिनांक : १० जून २०२६
वेळ : सकाळी ९.३० वाजता,उमेश प्रमोद पवार,अध्यक्ष, पुणे जिल्हा युवक काँग्रेस.

Back to top button