संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत होणार अनलॉक, राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीआरपी प्रकरण तसंच भाजपवर देखील टीका केली.
संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत होणार अनलॉक, राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीआरपी प्रकरण तसंच भाजपवर देखील टीका केली.
बारामती वार्तापत्र
‘आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार’ असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसंच, RTPCR टेस्टचा रेट 800 रुपयांपर्यंत आणल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा अहमदनगर येथे पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी अनलॉकबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
‘राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया’, असं वक्तव्य टोपे यांनी केलं. त्याचबरोबर ‘कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे’, असंही आवाहन सुद्धा टोपे यांनी केलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीआरपी प्रकरण तसंच भाजपवर देखील टीका केली. ‘काही न्यूज चॅनलच्या टीआरपी संदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे, असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तसंच कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याची काम काही चॅनल्सने केला. त्यामुळे त्यांच्यावर कठोरतील कठोर शिक्षा होण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
‘मास्क N 95 हा बाजारात 150 ते 200 रुपयाला मिळतो परंतु, त्याची बनविण्याची किंमत 12 रुपये इतकी आहे. एमआरपी नुसार तो 19 रुपयांपर्यंत विकला पाहिजे’, असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात सारख्या पुरोगामी राज्याला हे बिल्कुल मान्य नाही. त्यामुळे आता त्यासाठी समिती स्थापन करून अशा विक्रेत्यांना दिशा, आणि निर्देश दिल्याचे देखील टोपे यांनी यावेळी सांगितले.