अतुल होनकळसे यांना संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार जाहीर

मुंबईत २७ मार्चला होणार पुरस्काराचे वितरण

अतुल होनकळसे यांना संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार जाहीर

मुंबईत २७ मार्चला होणार पुरस्काराचे वितरण

कराड;प्रतिनिधी

साप्ताहिक आयुष्यमानचे संपादक व एजेएफसी संघटनेचे विश्वस्त अतुल होनकळसे यांना यंदाचा ajfc पत्रकार संघटनेचा दिला जाणारा संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.उद्या रविवार दि.२७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता मालाड-मुंबई येथे
या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती एजेएफसी संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी दिली.

पत्रकार अतुल होनकळसे हे गेल्या दोन दशकापासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत दैनिक प्रीतिसंगम रत्नागिरी टाइम्स लोकमंथन यामधून त्यांनी कराड प्रतिनिधी म्हणून काम केले आहे गेल्या दहा वर्षांपासून साप्ताहिक आयुष्यमानचे संपादक म्हणून ते कार्यरत आहेत अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून त्यांची शासन दरबारी नोंदही आहे यापूर्वी त्यांना पत्रकार युवा रत्न पुरस्कार तसेच पत्रकार भूषण पुरस्कार व चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पूरस्कार आदी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे ajfc पत्रकार संघटनेचा यावर्षीचा दिला जाणारा संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला आहे उद्या दिनांक 27 रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक तो होनकळसे याना प्रदान करण्यात येणार आहे त्यानिमित्त अतुल होनकळसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Related Articles

Back to top button