साखर कारखान्याच्या निवडणुकांचा हंगाम सुरू
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक २० सप्टेंबरपासून सुरू

साखर कारखान्याच्या निवडणुकांचा हंगाम सुरू
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक २० सप्टेंबरपासून सुरू
बारामती वार्तापत्र
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदा म्हणजे २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आज (दि:१३) रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण हे या संदर्भात आदेश बजावला. यामध्ये २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आदेश जारी केला आहे. यामध्ये मागील तीन वेळा या निवडणुका कोरोनाच्या कारणावरून स्थगित करण्यात आल्या होत्या. दरम्यान मधील कालावधीत सभासदांच्या पात्रते बाबत व अपात्रातेबाबत बदल करण्यात आलेले आहेत.
निवडणूक आराखड्यातील जिल्ह्यात प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका २० सप्टेंबरपासून सुधारीत निवडणुक कार्यक्रम आपण प्रमाणेच सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील संस्थांशिवाय इतर टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया परस्पर सुरू नयेत असे आदेश देखील देण्यात आले आहेत.