सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिंकली अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बेसबॉल स्पर्धा
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठला उपविजेतेपद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिंकली अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बेसबॉल स्पर्धा
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठला उपविजेतेपद
बारामती वार्तापत्र
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने पटकावले आहे. तर लवली प्रोफेशनल विद्यापीठाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दिनांक- 14 मार्च ते 19 मार्च दरम्यान अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी देशभरातून 40 विद्यापीठांच्या संघानी सहभाग नोंदवला होता. विजेतेपदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवारा पंजाब, कालीकत विद्यापीठ, केरळ आणि गुरुनानक विद्यापीठ, अमृतसर संघामध्ये साखळी सामने खेळवण्यात आले.
त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या आणि सर्वाधिक मिळालेल्या गुणांच्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बेसबॉल संघास विजेतेपद जाहिर करण्यात आले. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम टीसी महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहामध्ये पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिपक माने, संचालक, बोर्ड ऑफ स्पोर्टस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे लाभले होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अविनाश जगताप सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री अभिनंदन शहा, सर्व उपप्राचार्य पारितोषिक समारंभास उपस्थित होते. बारामतीमधील निरामय फाऊंडेशनचे डॉ. गांधी यावेळी उपस्थित होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. डॉ. गौतम जाधव यांनी
सर्व उपस्थितांचे स्वागत तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पारितोषिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दिपक माने यांनी बोलताना टीसी महाविद्यलयाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेचे आय़ोजन केले असे गौरव्द्गार काढले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी महाविद्यालयाची क्रीडाविषयक भूमिका मांडली. तसेच या स्पर्धांच्या
माध्यमातून देशाला उत्कृष्ट खेळाडू नक्कीच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बारामतीमधील निरामय मेडिकल फाऊंडेशनकडून खेळाडूंसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती. संपूर्ण स्पर्धेमध्ये श्री. प्रशांत कदम, श्री. योगेश खटके, श्री. अजय पारिख, श्री. प्रज्योत पवार, श्री. विष्णू काळेल, श्री. भरत गुंजाळ, श्री. तेजस कुलकर्णी, श्री. सोमनात नलावडे, श्री. मारुती व्यवहारे, श्री. अमोल वाघ, श्री. सुमीत दळवी, श्री. रोहीत ठाकूर, श्री. रोहित ठाकूर, श्री. रोहन लेगी, श्री. सार्थक कटारिया, श्री. संदिप सावंत, श्री. धनंजय शिरसट, श्री.धनश्री देवकर, श्री.फिरोज शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाचे आभार प्राध्यापक अशोक देवकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप सरोदे आणि स्मिता गोरे यांनी केले. आखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धांचे निकाल
प्रथम क्रमांक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
व्दीतीय क्रमांक – लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवारा, पंजाब
तृतीय क्रमांक – कालिकत विद्यापीठ, केरळ
उत्तेजनार्थ – गुरुनानक विद्यापीठ, अमृतसर
खेळाडूंची वैयक्तिक बक्षीसे
बेस्ट पिचर- मोहम्मद बुरान, कालिकत विद्यापीठ,
बेस्ट हिटरः सौरभ गायकवाड, लवली विद्यापीठ पंजाब,
मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर- विजय महाडिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
बेस्ट बेस प्लेयर- आकाश वन्ने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे