सिध्दीविनायक रुग्णालयाल सहकारातील मानबिंदू ठरेल=अरविंद मेहता
रूग्णालयाचे व्हाईस चेअरमन डॉ चेतन गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.

सिध्दीविनायक रुग्णालयाल सहकारातील मानबिंदू ठरेल=अरविंद मेहता
रूग्णालयाचे व्हाईस चेअरमन डॉ चेतन गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
गोखळी:प्रतिनिधी
(राजेंद्र भागवत यांचे कडून). प्रल्हाद भाऊ खटके ग्रामीण भागात निर्माण होणारे कौटुंबिक वाद, बांधायचं भांडणे, बँक ,पत्संस्था ,सोसायटी कर्ज वसुली, साखर कारखान्यांना जाणाऱ्या उसाच्या प्रश्नासंबंधी सामान्य माणसाच्या अडचणीच्या पाठीमागे उभे राहणारे व्यक्तिमत्व होते.
सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम सातत्याने प्रल्हाद भाऊ यांनी केले . त्यांच्याप्रमाणे डॉ शिवाजीराव गावडे गावडे सामान्य माणसांना मदत कशी करता येईल या भूमिकेतून सहकाराच्या माध्यमातून उभे राहत असलेले नवा उपक्रम सिद्धिविनायक सहकारी रूग्णालय या क्षेत्रातील सहकारातील मानबिंदू ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता यांनी केले.
कै. प्रल्हाद भाऊ माणिकराव खटके यांची पुण्यस्मरणानिमित्त श्री सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय मर्यादित गोखळी यांचे विद्यमाने व बारामती फलटण पुणे येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने गोखळी तालुका फलटण येथे आयोजित सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन फित कापून अरविंद भाई मेहता यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
हृदयरोग मधुमेह तपासणी विभागाचे उद्घाटन डॉ.प्रेमेद्र देवकाते यांचे हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बरड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रांजली शेळके व डॉक्टर गीतांजली साळुंखे गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सानिया शेख उपस्थित होते.यावेळी डॉ.प्रेमेद्र देवकाते, डॉ. राजेश कोकरे, डॉ. पांडुरंग गावडे , गोकुळ शिंदे, डॉ,सुरज धुरगडे, डॉ सचिन कोकणचे, डॉ.कल्याण नाळे, डॉ.स्वप्निल खोमणे, डॉ.निखिल गावडे, डॉ.प्रशात मिड, डॉ. ईशांत शिंदे, डॉ. अभिजीत शिंगाडे, डॉ. दिपीका कोकणे प्रशांत गावडे,प्रितम गावडे आदी विविध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
मेहता पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना ७५ वर्षापूर्वी लिहिली आज आपण अमृतमहोत्सवी साजरा करतोय कोणत्या घटनेप्रमाणे आपणाला अधिकार मिळतात का याचा विचार केला तर घटनेमध्ये प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे त्याचे अधिकार ठरवून दिलेले आहेत त्यांनी कोणती जबाबदारी पार पाडायची हे ठरवून दिलेले आहे पण गेल्या 75 वर्षांमध्ये आपल्याला त्याची अंमलबजावणी करता आली नाही, परंतु स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश यांनी केलेले कायदे लोकांवर वर्चस्व राहील अशा प्रकारचे कायद्याची रचना होती घटना स्वीकारली त्यावेळी या कायद्यामध्ये बदल होण्याची गरज होती कायद्याच्यातून लोकांची वर्चस्व शासन प्रशासनावर राहण्याची आवश्यकता होती पण ब्रिटिशांनी केलेले कायदे बदल केल्याने तसेच आहेत शासनकर्ते सांगतात आम्ही घटना दुरुस्ती केली परंतु परंतु जनतेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कायद्यात दुरुस्ती न केल्याने आज वीज आरोग्य प्रश्नावर नागरिकांना आवाज उठवता येत नाही आवाज उठवला तर कायद्याची भीती लाव दाखवत तुमच्यावर गुन्हे दाखल करु अशी धमकी देतात.
लोकशाहीमध्ये प्रशासनावर जनतेचे वर्चस्व असले पाहिजे वीज आरोग्य खात्याकडून योग्य सुविधा मिळाणे मुष्किल झाले आहे . लोकशाही स्वीकारली असली तरी योग्य अंमलबजावणी होत नाही या पार्श्वभूमीवर सहकाराच्या माध्यमातून उभे राहत असलेली श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल एक आदर्श म्हणून पुढे जाईल असे सांगितले.प्रास्वाविक डॉ शिवाजीराव गावडे यांनी सर्वरोग निदान उपचार शिबिर घेण्या पाठीमागचा उद्देश सांगून शिबिरासाठी बारामती फलटण पुणे येथून आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांची स्वागत केले.
या शिबिरामध्ये गोखळी खटकेवस्ती, जाधववाडी, पवार वाडी, साठे ,गुणवरे परिसरातील गरजू रुग्णांनी लाभ घेतला.शिबीराचे सुत्रसंचलन राजेंद्र पवार यांनी केले.यावेळी संजय कुमार बाचल, नंदकुमार गावडे प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील पोलीस पाटील विकास शिंदे महेश जगताप पप्पू जगताप बाळासो धनवडे आशा वर्कर्स दुर्गा फडके संगीता मचाले त्रिवेणी घाडगे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे अध्यक्ष मनोजतात्या गावडे, विश्वास दादा गावडे तानाजी बापू गावडे सूर्यकांत खटके (बारामती केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष) बापूराव गावडे सरपंच खटकेवस्ती डॉ राधेश्याम गावडे श्री मारुती (बापू) गावडे सिद्धिविनायक सहकारी रुग्णालयाचे संचालक डॉ अमोल आटोळे डॉहनुमंतराव गावडे सोमनाथ वायसे निलेश गावडे योगीराज गावडे आकाश राव घाडगे हनुमंतराव जाधव श्री राहुल भारती सौ वनिता गावडे तसेच डॉक्टर निखिल गावडे डॉक्टर समीर त्र्यंबकराव गावडे सचिव किशोर( पप्पू) जगताप यांनी सहकार्य केले..
ग्रामपंचायत गोखळी तसेच गोखळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सर्व पदाधिकारी श्रीराम पतसंस्थ यांनी आर्थिक व वस्तू रूपाने मदत केली.. विस्ताराधिकारी संजय बाचल साहेब यांनी सर्व रुग्णांना चहापान ची व्यवस्था केली सदर रोग निदान केल्यानंतर जी औषधे डॉक्टरांनी लिहून दिली त्यापैकी उपलब्ध औषधे सर्व रुग्णांना मोफत वाटण्यात आली अशा औषधांची किंमत 90 हजार एक लक्ष रुपये इतकी होती हाडांची ठिसूळता मोजण्याची तपासणी सामान्यपणे प्रति एक हजार ते दीड हजार रुपये आकारणी करून केली जाते ती तपासणी गावडे हॉस्पिटल बारामती यांनी 125 रुग्णांची मोफत करून दिली त्याचा अंदाजित खर्च एक लाख 87 हजार रुपयांच्या आसपास आला असता.
प्राथमिक आरोग्य केंद्र बरड व उपकेंद्र गोखळी यांचे मार्फत 100 रुग्णांची रक्तशर्करा चाचणी मोफत करून दिली.
निदान हॉस्पिटल गोखळी डॉ अमोल आटोळे यांनी तीस ते पस्तीस रुग्णांची मोफत ईसीजी करून दिले @ सत्तर रुग्णांची डोळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी 17 रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे स्किन विभागांमध्ये 43 रुग्णांची तपासणी झाली दंतरोग 15
जनरल सर्जरी 38 मधुमेह व हृदय रोग विभागांमध्ये 60 रुग्ण तपासले गेले स्त्रीरोग विभागामध्ये 35 रुग्णांची तपासणी केली .
या शिबिरासाठी Centure फार्मा कंपनी (प्रमोद पालीवाल व किरण पोटफोडे) Mega health care( महेश यादव )Aristo(मयूर हनुमंते) Bluecross(आशिष संकला संदीप भोपळे सुधीर मदने)Meridian company ( योगीराज गावडे) Systopic pharmaceuticals (धीरज थोरात जीवन शेवाळे) Mecoldoes company (आकाश घाडगे )यांनी मोलाचे सहकार्य केले.रूग्णालयाचे व्हाईस चेअरमन डॉ चेतन गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
निलेश गावडे विराज गावडे यांनी संपूर्ण दिवस औषध वितरण केले आलेल्या सर्व डॉक्टरां चे आभार मनोज तात्या डॉ. चेतन गावडे तानाजी बापू गावडे बाबा वरे बाळासाहेब गावडे पवारवाडी यांनी मानले संस्थेचे सभासदत्व खुले असून फलटण तालुक्यातील कोणीही व्यक्ती सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय चे सभासद होऊ शकते त्यासाठी प्रवेश फी रुपये 100 व भाग भांडवल रुपये दोन हजार पाचशे असे शुल्क आहे. संस्थेचा सभासद होण्याचा अर्ज संस्थेचे ऑफिस गोखळी येथे उपलब्ध आहे.
मागील आठवड्यामध्ये संस्थेचे एकूण 57 सभासदाची आरोग्य तपासणी केली असून सर्व सभासदांना लवकरच हेल्थ कार्ड दिले जाणार आहे सदर कार्ड भविष्यामध्ये विमा उतरवणे बारामती फलटण पुणे येथे अल्प दरामध्ये इलाज करण्यासाठी कामी आणण्याचे संस्थेच्या संचालकांनी निर्धारित केलेले आहे.शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ गणेश गावडे, अभिजीत जगताप, राधेश्याम जाधव,विद्या जगताप, दिगंबर महाराज घाडगे, सुरेश चव्हाण, जालिंदर भंडलकर, दत्ता ढोबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.