इंदापूर

बाबो……चोर तो चोर आणि चॉकलेट वर जोर…..

इंदापूर मध्ये ७ हजाराची चॉकलेट चोरीला

बाबो……चोर तो चोर आणि चॉकलेट वर जोर…..

इंदापूर मध्ये ७ हजाराची चॉकलेट चोरीला

इंदापूर: प्रतिनिधी

इंदापूर शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या एका मेडिकलच्या दुकानामध्ये दि.१७ रोजी रात्री चोरी झाली असून चोराने चॉकलेटचे बॉक्स चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.

सविस्तर हकीकत अशी की,इंदापूर शहरातील शिक्षक सोसायटी मधील गाळा नं- २ मध्ये असलेल्या विकास वामनराव भोसले यांच्या मालकीच्या संपदा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मध्ये चोरी झाली असून चोराने तब्बल ७००० रुपये किमतीच्या डेअरी मिल्क कॅडबरी चॉकलेटचे चार बॉक्स चोरून नेले आहेत.

तसेच ६ हजार ८०० रुपये रोख रक्कम संपदा मेडिकल अँड जनरल स्टोअर च्या गल्ल्यांमधून चोरून नेले आहेत. सदर चोरीची तक्रार इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये सदरील मेडिकलचे मालक विकास भोसले यांनी दिली असून भादवि कलम ४५७ , ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर चोरीचा उद्देश पहाता ही चोरी वयस्कर व्यक्तीने केली की लहान अल्पवयीन मुलाने केली हे अजून गुलदस्त्यात असून पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button