सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबे यांची बिनविरोध निवड!
मिलिंद कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर निवड.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबे यांची बिनविरोध निवड
मिलिंद कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर निवड.
सोमेश्वर;प्रतिनिधि
सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
या रिक्त जागेसाठी आज कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली, ज्यामध्ये तांबे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
मिलिंद कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर निवड.
सोमेश्वर कारखान्यात सत्ताधारी गटाच्या अंतर्गत सुत्रानुसार आणि ठरलेल्या आवर्तनानुसार माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण पुरंदर-बारामती तालुक्याचे आणि सभासदांचे लक्ष लागले होते. अखेर ज्येष्ठ संचालक किसन तांबे यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले.
जिजाऊ सभागृहात पार पडली बैठक
सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात आज संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्षपदासाठी किसन तांबे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे, त्यांची ‘बिनविरोध निवड’ झाल्याची अधिकृत घोषणा केली.






