मुंबई

स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश

'आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे असल्यामुळे स्थानिक‌ पातळीवर त्यांच्याशी जमवून घ्या,' असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिले.

स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश

‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे असल्यामुळे स्थानिक‌ पातळीवर त्यांच्याशी जमवून घ्या,’ असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिले.

मुंबई :बारामती वार्तापत्र
‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे असल्यामुळे स्थानिक‌ पातळीवर त्यांच्याशी जमवून घ्या,’ असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. राज्यात होऊ घातलेल्या पाच महापालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली. ‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्यावे,’ अशा स्पष्ट सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध महामंडळावरील नियुक्त्या लवकरच होणार आहेत, असेही संकेत त्यांनी दिले. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यासह मंत्री, वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. तसेच, मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते.

Back to top button