२०२९ ला अजून तीन वर्षे, एका वर्षात खूप गोष्टी बदलतात, २०२८ मध्ये.; युगेंद्र पवार बारामतीतून लढणार?
"इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत.

२०२९ ला अजून तीन वर्षे, एका वर्षात खूप गोष्टी बदलतात, २०२८ मध्ये.; युगेंद्र पवार बारामतीतून लढणार?
“इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामतीचा ‘दादा’ कोण, यासाठी पवार घराण्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) आमदार रोहित पवार हे बारामतीतील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवादाचे आयोजन करत आहेत.
दुसरीकडे जय पवार यांच्याकडूनही जनसंवादाचे आयोजन करण्यात आलं होतं. तर, युगेंद्र पवार हे सुद्धा बारामतीतील गावांमध्ये फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे २०२९मध्ये निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरते हे पाहणे महत्त्वाचं आहे.
पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार ) कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. यावर युगेंद्र पवारांनी २०२९ मध्ये आपण बघू… याचे उत्तर २०२८ मध्ये मला विचारा, तेव्हा मी सांगेल, उत्तर दिलं आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
युगेंद्र पवारांनी आमदार व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण, तुम्ही पवार विरुद्ध पवार, अशी लढणार होणार नसल्याचे सांगितलं आहे. मग तुम्ही आमदार कसे होणार? असा प्रश्न विचारल्यावर युगेंद्र पवार म्हणाले, “२०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार, अशी लढाई होईल याची काय गॅरंटी आहे. उद्या काहीही होऊ शकते.”
२०२९ मध्ये बारामतीतून तुम्ही निवडणूक लढणार का? असे विचारल्यावर युगेंद्र पवारांनी म्हटलं, “२०२९ ला अजून तीन वर्षे आहेत. माझे उत्तर बदलणार नाही. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात. २०२९ साली आपण बघू. २०२८ मध्ये मला विचारा. तेव्हा मी सांगेल.”
“इथे ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांना मोठी मोठी पदे मिळाली आहेत. कदाचित माझी चुकीचे अपेक्षा असू शकते. मला पद मिळालं नाही, हे माझ्याच फायद्याचं ठरलं. मला लोकांसाठी जास्त वेळ द्यायला मिळाला. लोकांमध्ये मी जावू शकलो. काही लोक पद घेतात पदाला न्याय देत नाहीत मला तसं करायचं नव्हतं. मला पद मिळालं नाही, त्यामुळे बारामतीकरांसाठी वेळ देता आला,” असे युगेंद्र पवारांनी सांगितलं.






