पत्रकारितेतील मूल्य कायम राहणार-अतुल तेरखेडकर
ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर म्हणाले, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेतले.
पत्रकारितेतील मूल्य कायम राहणार-अतुल तेरखेडकर
ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर म्हणाले, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेतले.
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
बदलत्या काळानुसार पत्रकारितेसमोर आव्हाने असली तरी पत्रकारितेतील मूल्य कायम राहणार असे मत ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर यांनी इंदापूर या ठिकाणी बोलताना व्यक्त केले.
इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी क्लब मध्ये “लोकशाही उत्सवा” निमित्त आम्ही ‘बी’ घडलो आणि ‘पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर बोलत होते. कार्यक्रमास साथी सलीम शेख, डॉ. विकास शहा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर गलांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक गफूर सय्यद, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,राहुल ढवळे,नीलकंठ मोहिते, सुरेश जकाते, महेश स्वामी,सागर शिंदे,सुरेश मिसाळ, काकासाहेब मांढरे, धनंजय कळमकर, संतोष दहिदुले, देवीदास राखुंडे,सिद्धार्थ मखरे, श्रेयश नलवडे,हमीद आत्तार,जितेंद्र जाधव,सत्यजित रणवरे,दीपक खिलारे,तात्याराम पवार, शिवकुमार गुणवरे,जावेद शेख आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर म्हणाले, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेतले. बिघडल्याशिवाय समाजकार्य करता येते नाही. १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली तेव्हा सर्व वर्तमानपत्राची पाने कोरी होती. शब्द स्वातंत्र्य गोठण्याचा पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारांनी केलेला निषेध होता. आपल्या देशामध्ये लोकशाहीची पाळंमुळं रुजल्यामुळे या देशातील लोकशाही कधी ही संपणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेले आहे ते मजबूत आहे. त्यामुळे कुणीही धक्का लावू शकत नाही असे सांगून तेरखेडकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रिंट मिडीयाच होता. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्युब, पोर्टल आणि फेसबूक सारखी माध्यम अस्तित्वात आली त्यामुळे पत्रकारितेचे समोर आव्हाने उभी असली तरीही पत्रकारितेचे मूल्य कायम राहतील असे ठामपणे त्यांनी सांगितले.
साथी सलीम शेख म्हणाले, सध्या प्रसारमाध्यमे निद्रितावस्थेत आहेत त्यासाठी पत्रकारांनी पत्रकरिता जबाबदारीने करावी. पत्रकारितेची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. समाजातील वंचितांना सामाजिक न्याय कसा देता येईल. जर लोकशाहीची जोपासना करायची असेल तर लोकशाहीतील घटक पत्रकारांनी बनले पाहिजे. समाजाची मानसिकता परिवर्तन करण्याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन शेख यांनी केले.
यावेळी डॉ.विकास शहा म्हणाले, समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम पत्रकारिता करते. प्रशासनात काम करताना राज्यकर्त्यांना अनेक अडचणी येतात. तसेच प्रशासनातील नियम लोककल्याणाच्या आड येतात तेव्हा पत्रकारिता तारू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार मधुकर गलांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे, इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, राष्ट्र सेवा दलाचे गफूर सय्यद, रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे आदींची भाषणे झाली. त्याचप्रमाणे राहुल ढवळे,नीलकंठ मोहिते, सुरेश मिसाळ,संतोष दहिदुले, शिवकुमार गुणवरे, काकासाहेब मांढरे, कैलास पवार आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेश स्वामी यांनी केले आभार प्रदर्शन सागर शिंदे यांनी मानले.