
बारामती मध्ये युवासेनेचा झंझावाती दौरा
दौंड इंदापूर बारामती तालुक्याचा युवा सैनिकांचा आढावा
बारामती वार्तापत्र
पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख माननीय नामदार आदित्यजी ठाकरे साहेब यांचे आदेशावरून व विभागीय नेते संजय जी राऊत साहेब व विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या सूचनेवरून पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सत्यवान जी उभे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली युवासेनेचे बारामती लोकसभा युवासेना विस्तारक माननीय श्री गणेश भाऊ कवडे यांनी दौंड इंदापूर बारामती तालुक्याचा युवा सैनिकांचा आढावा व धावता दौरा आयोजित केला होता त्यावेळी बारामती तालुक्यामध्ये युवा सेनेचा विस्तार करण्यासाठी व संघटनात्मक नवीन निवडी व शाखा निर्माण करणेबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बारामती या ठिकाणी विस्तारक गणेश भाऊ कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली त्यावेळी जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र भाऊ काळे तसेच उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे तालुकाप्रमुख विश्वास मांढरे शहर प्रमुख वस्ताद पप्पू शेठ माने युवा सेना तालुका प्रमुख निखिल देवकाते पाटील व विभाग प्रमुख माजी सरपंच सतीश अण्णा काटे उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने युवा सैनिक उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख युवासेना इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी युवासेना विस्तारक गणेश भाऊ कवडे व जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र काळे यांनी नवनिर्वाचित युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले