रेशन दुकानांसमोरच बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली हमीपत्रांची होळी
हमीपत्र असंविधानिक असल्याचे केले मत व्यक्त

रेशन दुकानांसमोरच बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली हमीपत्रांची होळी
हमीपत्र असंविधानिक असल्याचे केले मत व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
शासनाने रेशन दुकानात अर्जाबरोबर जे हमी पत्र दिले आहे ते असंविधानिक असून गरीब बहुजन समाजावरती विचारपूर्वक अन्याय असून ते हमीपत्र मान्य नसल्याचे म्हणत बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.२६) रोजी इंदापूर मधील विविध रेशनिंग ( स्वस्त धान्य दुकान ) दुकानांच्या समोर सदरील हमी पत्रांची होळी केली.
यावेळी बोलताना बहुजन मुक्ती पार्टी चे संजय शिंदे म्हणाले की, संपूर्ण भारतामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन धारकांना जो अर्ज दिला जात आहे तो अर्ज संविधानाच्या विरोधात आहे. संविधानिक दृष्ट्या बेकायदेशीर आहे. अर्जाच्या शेवटच्या पानावर हमीपत्र आहे ते हमीपत्र वाचल्यास असे लक्षात येईल की हे सर्व भारतीय लोकांच्या बहुजन समाजातील गोरगरीब लोकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यासाठी अर्ज बनवण्यात आला आहे. तो संविधानाच्या शंभर टक्के विरोधामधील आहे. कारण केंद्र सरकारने ज्या लोकांना गॅस नाही अशांना शंभर रुपयांमध्ये गॅस दिला आणि भारतातील गोरगरिबांच्या घरात गॅस आल्यानंतर आता हे सांगतात की, त्यांच्या घरात गॅस आहे त्यांना शिधापत्रिका मिळणार नाही.त्यामुळे हे सर्व चुकीचे असल्याने आम्ही हा अर्ज जाळत असून संपूर्ण भारतात बहुजन मुक्ती पार्टी कडून या हमिपत्रा ची होळी करण्यात येत आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका संघटक संजय शिंदे, बहुजन मुक्ती पार्टी चे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष आझाद सय्यद, मूलनिवासी वारकरी संघाचे तालुकाध्यक्ष बलभीम महाराज राऊत,भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष नागेश भोसले, भारतीय विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चा पुणे जिल्हा प्रभारी सुरज धाईंजे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहित ढावरे,भारत मुक्ती मोर्चाचे इंदापूर शहर उपाध्यक्ष नितीन देशमाने उपस्थित होते.