बारामतीत शिवजयंती उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी
यावेळी ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.
बारामतीत शिवजयंती उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी
यावेळी ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
सालाबाद प्रमाणे तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती बारामती आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बारामती शहरात उत्साहाने साजरी झाली त्या निमित्त छत्रपती शिवाजी ऊध्यान कसबा येथे शिवप्रतीमेचे पूजन झाले. कोरोणाच्या महामारी च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत.त्यामुळे निर्बंधाचे पालन करत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनील (आण्णा) शिंदे, पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे ,उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर ,गटनेते सचिन सातव ,प्रशांत सातव ,हेमंत नवसारे, अँड हरीश तावरे, अँड विशाल बर्गे, दिलीप ढवाण ,जितेंद्र जाधव , अनिल सावळे पाटील,रीतेश सावंत,योगेश ढवाण, संजय किर्वे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत गणेश कदम यांनी केले. अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ व शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित समारंभात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन जाधव, नीलेश गायकवाड, श्रीकांत जाधव यांच्यासह अनिता गायकवाड, सीमा – चिंचकर, ज्योती इंगळे, शीतल – गायकवाड, ज्योती लडकत आदी- उपस्थित होते.